पुणे : दिवाळीत शहरातील विविध पाेलीस ठाण्यांमधील १७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांची वाहतूक शाखेत करण्यात आली. मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे यांची बदली गुन्हे शाखेत करण्यात आली. पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदल करण्यात आली. विशेष शाखेतील (स्पेशल ब्रँच) पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांची वाहतूक शाखेत,बदली करण्यात आली.

नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक अजय संकेश्र्वरी यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांची पोलीस निरीक्ष गुन्हे म्हणून बदली करण्यात आली आहे. विशेष शाखेतील निरीक्षक संदिपान पवार यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.

अरूण हजारे यांची नियंत्रण कक्षातून आर्थिक गुन्हे शाखेत, गुरूदत्त माेरे यांची नांदेड सिटी पोलिस ठाण्यातून विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्ताराम बागवे यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांची येरवडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. मंगेश हांडे यांची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांची मुंढवा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची वानवडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांची कोंढवा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांची विश्रामबाग पोलीस ठाणअयात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली. बंडगार्डन पोलीस ठाण्यात तात्पुरत्या स्वरुपात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी संतोष पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पांढरे यांची आता बंडगार्डन पोलीस ठाण्यात नियमित स्वरुपात बदली करण्यात आली आहे.