पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याची शुक्रवारी रंगीत तालीम घेण्यात आली. पंतप्रधान मोदी लोहगाव विमानतळावरून ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरने जाणार आहेत, त्या ठिकाणी प्रत्यक्ष हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. तसेच ऐन वेळी हेलिकॉप्टरने प्रवास टाळल्यास रस्त्याने जाण्याच्या ठिकाणापर्यंतची आणि पुणे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या मार्गावर मेट्रोची रंगीत तालीम घेण्यात आली. केंद्रीय सुरक्षा पथक, पुणे पोलीस, जिल्हा प्रशासन, पुणे मेट्रो आणि संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी या वेळी उपस्थित होते,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी यांचे सकाळी ११ वाजता लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने कृषी महाविद्यालय येथे येतील. तेथून पुणे महापालिका भवन येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळय़ाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी महापालिकेतून कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय येथे पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आणि मेट्रोने आनंदनगपर्यंतचा प्रवास करणार आहेत. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर मोदी यांची जाहीर सभा होणार असून त्यानंतर ते हेलिकॉप्टरने लवळे येथील सिम्बायोसिस महाविद्यालयाला भेट देणार आहेत. दुपारी दोन वाजता पंतप्रधान मोदी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले,  करोना चाचणी नकारात्मक येणाऱ्या अधिकाऱ्यांनाच रविवारी   पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात सहभागी होता येईल.   सुरक्षेच्या कारणास्तव शनिवार आणि रविवारी दोन दिवस पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात पॅराग्लायिडग, हॉट बलून अशा प्रकारच्या अवकाश उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police review security ahead of pm narendra modi s pune visit zws
First published on: 05-03-2022 at 01:45 IST