scorecardresearch

“चोराच्या मनात चांदणं” असं म्हणत प्रकाश आंबडेकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ऐकेरी टीका, म्हणाले, “मोदीच्या मनात अजूनही…”

“लोकसभेत बहुमत असेपर्यंत नरेंद्र पंतप्रधान आहेतच, ते आम्हाला मान्यच आहे. पण आज ईडी, सीबीआयचा धाक आहे. तुरुंगात जाण्याचा धाक वाटतो म्हणूनच सर्व मोदींना हात जोडतात. त्यांची प्रशंसा करतात. अनेक विशेषणे त्यांना देतात, पण मनातल्या मनात हे कधी जातंय, याचीच सर्व वाट बघत आहेत. मला काही भाजपचे लोक म्हणाले, आम्ही २०२४ मध्ये परत येऊ. मी त्यांना […]

Prakash-Ambedkar-Narendra-Modi-1
ॲड. प्रकाश आंबेडकर व पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

“लोकसभेत बहुमत असेपर्यंत नरेंद्र पंतप्रधान आहेतच, ते आम्हाला मान्यच आहे. पण आज ईडी, सीबीआयचा धाक आहे. तुरुंगात जाण्याचा धाक वाटतो म्हणूनच सर्व मोदींना हात जोडतात. त्यांची प्रशंसा करतात. अनेक विशेषणे त्यांना देतात, पण मनातल्या मनात हे कधी जातंय, याचीच सर्व वाट बघत आहेत. मला काही भाजपचे लोक म्हणाले, आम्ही २०२४ मध्ये परत येऊ. मी त्यांना म्हणालो २०२४ च काय, आम्हाला तुरुंगात टाकलं, तर तुम्ही २०२९ मध्ये देखील परत याल. कुणी विरोधकच शिल्लकच ठेवला नाही तर तुम्हाला विरोध करणार कोण?”, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. खडकवासला मतदार संघातील कोल्हेवाडी येथे वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

हे वाचा >> “तर २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी – अमित शहांना तुरुंगात टाकू”, प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक वक्तव्य

चोराच्या मनात चांदणं

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका करत असताना आंबेडकर म्हणाले, “बीबीसीची डॉक्यूमेंट्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली. गुजरात दंगलीनंतर दोन विधानसेभेच्या निवडणुकीत मतदारांनी हा दंगलखोर आहे का? याचा विचार केला नाही. केंद्रातही दोनदा पंतप्रधान केलं. चोराच्या मनात चांदणं जसं असतं, तसं मोदींच्या मनामध्ये भीती आहे की, माझं २००४ चं चारित्र्य पुन्हा लोकांसमोर येऊ नये, म्हणून त्यांनी बीबीसीच्या वृत्तपटावर बंदी आणली. जे जे सत्य दाखविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे.”

हे देखील वाचा >> दुबईमधील अल मिन्हाद जिल्ह्याचे नाव आता ‘हिंद सिटी’; शेख मोहम्मद बिन रशीद यांच्या पत्नीचे नाव देखील आहे हिंद

अदाणी मोदींच्या मांडीवर बसलेले आहेत

अदाणी समूहाने केलेल्या घोटाळ्यामुळे ४३ हजार कोटींचे नुकसान झाले. भाजपाचे सरकार अदाणी समूहाला एलआयसीचे ७८ हजार कोटी द्यायला निघालेले आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला. यावेळी त्यांनी गौतम अदाणी यांची धंदा करण्याची पद्धत कशी आहे, हे एका उदाहरणातून सांगितले. ते म्हणाले, “आपण हॉटेलमध्ये गेल्यावर आपण रुम बुक करतो, तिथे जेवतो. अदाणीची धंदा करण्याची पद्धत अशी की, तो हॉटेलमध्ये जेवतो पण हॉटेलच्या रुमचे पैसे देत नाही. हॉटेल मालकाला सांगतो, मी आठ दिवसांनी येऊन पुन्हा रुम बुक करेल आणि तुमचे सगळे पैसे देईल. आठ दिवसांनी येऊन यावेळी रुमचे पैसे देतो आणि जेवणाचे बिल शिल्लक ठेवून जातो. हेच अदाणीने बँकेच्या बाबतीत केले आहे. एका बँकेकडून कर्ज घ्यायचे आणि दुसऱ्या बँकेला द्यायचे परत तिसऱ्या बँकेतून कर्ज काढायचे. या सर्व प्रकरणाचा आता निकाल लागला आहे. पण अदाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मांडीवर बसलेले असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार नाही. उलट त्याला एलआयसीचे ७८ हजार कोटी दिले जातील, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 09:15 IST