पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या कार्यक्रमानिमित्ताने उद्या (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. सुमारे दीड वर्षांनंतर पंतप्रधान पुण्यात येत असून, या दौऱ्यात मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन, विविद विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करणार आहेत.

मेट्रो प्रकल्पातील वनाज ते गरवारे महाविद्यालय मार्गावरील मेट्रोच्या उद्घाटनानिमित्ताने पंतप्रधान मार्च २०२२मध्ये पुण्यात आले होते. त्यानंतर जवळपास दीड वर्षांनी ते पुन्हा पुण्यात येत आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आरती करून पंतप्रधानांचा पुणे दौरा सुरू होणार आहे. त्यानंतर ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणार आहेत. पुणे मेट्रो टप्पा १च्या काम पूर्ण झालेल्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक, तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेली १२८० हून अधिक घरे, तर पुणे महापालिकेने बांधलेली २६५० हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरित केली जाणार आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या सुमारे ११९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६४०० हून अधिक घरांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

पंतप्रधान बंदोबस्ताची रंगीत तालीम; रस्ते बंद केल्याने वाहतुकीचा बोजवारा; नागरिकांना मनस्ताप

पुणे: महापालिकेचा सर्व्हर डाऊन; मिळकतकर भरण्यास अडचणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी महापालिका आणि प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. त्यात रस्त्यांच्या डागडुजीपासून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा समावेश आहे.

पंतपधान नरेंद्र मोदी पुणे दौरा

  • सकाळी १०.१५ लोहगाव विमानतळावर आगमन
  • सकाळी १०.४० कृषि महाविघालयाच्या मैदानवरील हेलिपॅडवर आगमनसकाळी १०.५५ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन
  • सकाळी ११ तेे ११. ३० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात पूजा
  • सकाळी ११ .४५ वाजता लोकमान्य टिळक पुरस्कारः स. प. महाविद्यालय (कार्यक्रम निमंत्रितांसाठी)
  • दुपारी १२.४५ वाजता मेट्रोच्या दोन विस्तारित मार्गांचे लोकार्पण, पंतप्रधान आवास योजनेतील पुणे आणि पिंपरीतील चार हजार सदनिकांचे लोकार्पण, पीएमआरडीएच्या सहा हजार घरांचे भूमिपूजन (खुला कार्यक्रम)
  • दुपारी १.४५ ते २.१५ राखीव
  • दुपारी २.२५ कृषि महाविघालयाच्या मैदानवरील हेलिपॅडवर आगमन
  • दुपारी २.५५ वाजता दिल्लीकडे प्रस्थान