हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांना स्थानिक आमदार संतोष बांगर यांनी १३ ऑक्टोबर रोजी मोठ्या जनसमुदायासमोर अर्वाच्य भाषेमध्ये बोलून अपमान करून त्यांना मारहाणीची धमकी दिली होती. या घटनेचा निषेध म्हणून राज्यभरात कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज १७ ऑक्टोबर, सोमवारी कामबंद आंदोलन केले. पुण्यात कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी कृषी आयुक्त धीरजकुमार यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध केला.

हेही वाचा >>>पुणे : गरजूंच्या दिवाळी धान्यसंच वितरणात अडथळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत अतिवृष्टी, पावसातील खंड, कीड व रोगांचा प्रादुर्भाव , ढगफुटी, पूर, सततचा पाऊस अशा विविध आपत्तींमुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून मदत करण्यासाठी कृषी विभाग सातत्याने विमा कंपन्यांबरोबर पाठपुरावा करत आहे, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी मेहनत घेत आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे खात्यातील अधिकारी- कर्मचारी यांचे मनोबल खचले आहे. या घटनेचा निषेध म्हणून राज्यातील सर्व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.