पुणे : शिरुर पोलीस ठाण्यासमोर महिलेने अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. शिरुरमधील एका शाळेत रात्री उशिरापर्यंत ध्वनीवर्धक सुरू असल्याने महिलेच्या मुलाच्या अभ्यासात अडथळा आला होता. जाब विचारणाऱ्या महिलेला शिवीगाळ करण्यात आली होती.

सुमन सखाराम साळवे (वय ४४, रा. बगाड रस्ता, रामलिंग, शिरुर, जि. पुणे) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रामलिंग रस्त्यावर साळवे यांच्या घराशेजारी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. शाळेच्या आवारात रात्री उशिरापर्यंत ध्वनीवर्धक सुरू होते. ध्वनीवर्धकावरील गाण्यांवर शिक्षक नृत्य करत होते. महिलेचा मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. मुलगा अभ्यास करत असल्याने त्याला त्रास दिला. त्यानंतर महिला आणि तिचा मुलगा शाळेत गेले. ध्वनीवर्धकाचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने वाद झाला. त्यावेळी शाळेच्या आवारात दहा ते बारा जण मद्य पिऊन नृत्य करत होते. महिलेने मोबाइलवर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. तेव्हा शाळेतील प्राचार्य महिलांनी साळवेंच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतला. प्राचार्यांसोबत असलेल्या दोन महिलांनी त्यांना धक्काबुक्की केली. साळवे यांचा मुलगा जीवन याला धक्काबुक्की करण्यात आली. साळवे आणि त्यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा – Sharad Pawar : “मुख्यमंत्रीपदामध्ये रस नाही, परिवर्तनासाठी सत्ता हवी”, शरद पवार यांचे स्पष्टीकरण

हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : “…तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाहीत”, हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर बावनकुळेंचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या घटनेनंतर साळवे आणि त्यांचा मुलगा घरी परतले नाहीत. त्यामुळे मुलगा आणि पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार सखाराम यांनी पोलिसांकडे दिली. शाळेतील शिक्षक, तसेच कर्मचाऱ्यांनी त्रास दिल्याने पत्नी आणि मुलगा बेपत्ता झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. त्यानंतर बुधवारी रात्री साळवे शिरुर पोलीस ठाण्यासमोर आल्या. त्यांनी अंगावर ढिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. साळवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन शिक्षकांसह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.