scorecardresearch

पुणे विमानतळावर आता ‘फेशियल रिक्गनिशन’, प्रवाशांसाठी आतमध्ये प्रवेश करणे आणि सुरक्षा तपासणी होणार सुटसुटीत

पुणे विमानतळात प्रवेश करणे आणि तेथील सुरक्षा तपासणी प्रवाशांसाठी सुटसुटीत होणार आहे. विमानतळावर ‘फेशियल रिक्गनिशन’ यंत्रणेच्या सहाय्याने प्रवाशांची ओळख पटवली जाणार आहे.

adani airport
(संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता)

पुणे : पुणे विमानतळात प्रवेश करणे आणि तेथील सुरक्षा तपासणी प्रवाशांसाठी सुटसुटीत होणार आहे. विमानतळावर ‘फेशियल रिक्गनिशन’ यंत्रणेच्या सहाय्याने प्रवाशांची ओळख पटवली जाणार आहे. यासाठीच्या डिजियात्रा या प्लॅटफॉर्मचा वापर शुक्रवारपासून (ता.३१) वापर सुरू होणार आहे.

डिजियात्राचा वापर सुरू होणार असला तरी सध्याची विमानतळात प्रवेश करणे आणि सुरक्षा तपासणीची व्यवस्था कायम राहणार आहे. प्रवाशांना डिजियात्रा अथवा सध्या सुरू असलेल्या पद्धतीपैकी एकाची निवड करावी लागेल. जास्तीतजास्त प्रवाशांनी डिजियात्राचा वापर करावा, असा विमानतळ प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे. सध्या देशातील तीन विमानतळावर डिजियात्रा सुविधेचा वापर केला जात आहे. दिल्ली, बंगळुरू आणि वाराणसी विमानतळावर ही सुविधा मागील वर्षी डिसेंबरपासून सुरू झाली. ही सुविधा असणारे पुणे हे चौथे विमानतळ ठरणार आहे. यानंतर कोलकता, हैदराबाद आणि विजयवाडा या विमानतळावर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

डिजियात्रा वापर कसा होतो?

प्रवाशांना मोबाईलवर डिजियात्रा अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. प्रवासी त्यांचे ओळखपत्र आणि प्रवासाशी निगडित कागदपत्रे त्यात ठेवू शकतात. विमानतळावर पोहोचल्यानंतर फेशिलय रिक्गनिशन तंत्राद्वारे प्रवाशाची ओळख पटवली जाईल. त्याचवेळी प्रवाशाच्या ओळखपत्रांचीही तपासणी होईल. यामुळे प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी होऊन विमानापर्यंत पोहोचण्याचा वेळही कमी होईल.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 23:04 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या