पिंपरी-चिंचवड : पुणे- बंगळुरू महामार्गावरील अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अपघातात सुदैवाने दुचाकी वरील दोघे जण थोडक्यात बचावले आहेत. ही घटना कार च्या डॅश कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघात इतका भीषण होता, की दुचाकी वरील दोघेजण काही अंतरावर फरपटत गेले.

पुणे- बंगळुरू महामार्गावर घडलेल्या अपघाताचा एक सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. हा अपघात पुणे- बंगळुरू महामार्गावरील हॉटेल टीप- टॉप इंटरनॅशनल च्या समोर घडला आहे.

भरधाव कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने समोरील दुचाकी चालकाला धडक दिली. दुचाकी चालक थेट कारवर येऊन धडकला. दुचाकी वरील मागे बसलेल्या दुचाकी स्वाराचे हेल्मेट देखील धक्क्याने खाली पडले. दोघेही पुणे- बंगळुरू महामार्गावर काही अंतरावर फरपटत गेले. सुदैवाने दोघे जण थोडक्यात बचावले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाठीमागून येणाऱ्या वाहनाने प्रसंगावधान दाखवत ब्रेक दाबल्याने मोठा अपघात टळला आहे. दोघांना गंभीर इजा झाली आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चारचाकी वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.