मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (७ सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरातील प्रमुख गणेश मंडळांना भेट देणार असून फडणवीस पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा >>> पुणे : आयटीआय प्रवेशांसाठी पुरवणी वेळापत्रक ; ११ सप्टेंबरपर्यंत मुदत

Udayanraje Bhosle filled the nomination form in a show of strength
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उदयनराजेंनी भरला उमेदवारी अर्ज
Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
vinod patil s meeting with chief minister deputy chie
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी विनोद पाटील यांची चर्चा; छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात उमेदवारी देण्याच्या हालचाली
Sunita Kejriwal is likely to become Delhi Chief Minister
सुनीता केजरीवाल यांच्याक़डे मुख्यमंत्रीपद येण्याची शक्यता

कसबा पेठ, त्वष्टा कासार, तरूण अशोक मंडळ, दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा, यशवंतनगर गणेशोत्सव मंडळ, साई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदी गणेशमंडळांना एकनाथ शिंदे भेट देणार आहेत. अभिनेता नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे गणेश दर्शन घेणार आहेत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक स्मारकाला भेट देणार आहेत. त्यानंतर नाईक यांच्या जयंती सोहळ्यासही ते उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्यामुळे शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.