पुणे : शहराचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी (९ ऑक्टोबरला) बंद राहणार आहे. वेगवेगळ्या भागांतील जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या, पंपिंग स्टेशन येथे विद्युत व स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या कामामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (१० ऑक्टोबरला) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
महापालिकेचे नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि त्या अंतर्गत येणारी पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर, पर्वती एलएलआर टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एम.एल.आर. टाकी परिसर, चतुश्रुंगी टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईट, लष्कर जलकेंद्र, होळकर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल, वारजे फेज क्र. १ व २, वारजे जलकेंद्र, एस.एन.डी.टी. एच.एल.आर. चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र, जीएसआर टाकी परिसर, गणपती माथा व जुने वारजे जलकेंद्र या ठिकाणची विद्युत पंपींग आणि वितरण व्यवस्थेसंदर्भात तातडीचे देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यासाठी महावितरणच्या वारजे विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी पत्र दिले आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.
पाणीपुरवठा बंद असणारा परिसर
पर्वती: शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, सोमवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, घोरपडे पेठ, लोहियानगर, पर्वती दर्शन, सहकारनगर पद्मावती, बिबवेवाडी, बिबवेवाडी गावठाण, मुकुंदनगर, महर्षीनगर, चिंतामणीनगर, लेक टाऊन, सॅलिसबरी पार्क, गिरिधर भवन, आंबेडकरनगर, प्रेमनगर, पर्वती गावठाण, कोंढवा खुर्द, साईबाबानगर, इंदिरानगर.
वारजे जलकेंद्र व गांधी भवन टाकी परिसर : पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड, मधुबन सोसायटी, कोकाटेवस्ती, संपूर्ण बावधन परिसर, उजवी व डावी भुसारी कॉलनी, चिंतामणीनगर, गुरू गणेशनगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लमाणतांडा, मोहननगर, सूस रोड, सागर कॉलनी, भारतीनगर, सारथी शिल्प, शांतिबन सोसायटी, डुक्करखिंड, शास्त्रीनगर, परमहंसनगर, कुंभारवाडी, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, वारजे माळवाडी, पॉप्युलर कॉलनी, गोकूळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, शांतिवन, गांधी स्मारक भवन, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मुंबई पुणे महामार्ग दोन्ही बाजू, कर्वेनगर गावठाण, तपोधाम, गोसावीवस्ती, कॅनॉल रोड.
खराडी पंपिंग, लष्कर जलकेंद्र: मुळा रोड, खडकी कॅन्टोन्मेंट परिसर, एमईएस, एचई फॅक्टरी, रामटेकडी, सय्यदनगर, हेवन पार्क, गोसावीवस्ती, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड, केशवनगर, मांजरी, शेवाळेवाडी, बी. टी. कवडे रोड, कोरेगाव पार्क, ओरियंटन गार्डन, साडेसतरानळी, महम्मदवाडी, फुरसुंगी, उरुळी देवाची, रेसकोर्स, कॅम्प, ससून, खराडी गावठाण, विश्रांतवाडी, विमाननगर.
पॅनकार्ड क्लब परिसर: बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखेवस्ती, विधातेवस्ती, मेडीपॉइंट रोड, विजयनगर, दत्तनगर, कर्वेनगर गावठाण, शाहू कॉलनी, इंगळेनगर, वारजे जकातनाका.
एसएनडीटी परिसर: गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, संपूर्ण कोथरूड, रेव्हेन्यू कॉलनी, वडारवस्ती, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंधानगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदूवाडी, वडारवाडी, पोलिस लाइन, संगमवाडी, विधी महाविद्यालय रस्ता, पौड रोड, करिष्मा परिसर सोसायटी, डी.पी. रस्ता, मयूर कॉलनी, कर्वे रोड, एरंडवणा. चतुःशृंगी परिसर: औंध, बोपोडी, भोईटेवस्ती, विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, सकाळनगर, चव्हाणनगर, संकल्प पार्क, अभिमान श्री सोसायटी, नॅशनल, सिंध सोसायटी, औंध गाव, जुनी व नवीन होळकर.