हडपसर भागातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. पोलिसांनी लॉजवर छापा टाकून पाच महिलांना ताब्यात घेतले. या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा >>> पुणे पोलिसांची कमाल; चोरीला गेलेले मोबाईल केरळ, कर्नाटक आंध्रमधून शोधून आणले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारुती महादेव जाधव (रा. पापडे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. हडपसर परिसरातील स्वर्ग लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने लॉजवर छापा टाकून पाच महिलांना ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आदेशाने महिलांची रवानगी निरीक्षणगृहात करण्यात आली. लॉज चालक जाधव याने महिलांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्या प्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, राजेंद्र कुमावत, मनीषा पुकाळे, तुषार भिवरकर आदींनी ही कारवाई केली.