पुणे शहरातील वानवडी येथील संविधान चौकातील खाऊ गल्लीत रात्री उशीरापर्यंत खाद्यपदार्थाची गाडी बंद करण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी महिला उपनिरीक्षकाच्या हाताचा एका महिलेने चावा घेतला,तर दुसर्‍या महिलेने शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. भगवती सौंद आणि सुमित्रा थापा या दोन महिलांनी विरोधात वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस स्टेशनमध्ये सारिका शिर्के या प्रशिक्षणार्थी महिला उपनिरीक्षक या पदावर नेमणुकीस आहेत. त्या वानवडी येथील संविधान चौकात रविवारी रात्री खाऊ गल्ली परिसरात गेल्या. त्या ठिकाणी भगवती सौंद आणि सुमित्रा थापा यांची खाद्यपदार्थाची गाडी सुरु होती. ती गाडी बंद करण्यासाठी सांगितली. पण त्या दोन्ही महिलांनी सारिका शिर्के यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.त्यावेळी भगवती सौंद हीने सारिका शिर्के यांच्या हाताला चावा घेतल्याची घटना घडली. तर दुसर्‍या महिलेने शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. तर या प्रकरणी दोन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत आहे.