पिंपरी – चिंचवड : आयटी हब हिंजवडीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा दौरा करत आहेत. हिंजवडीमध्ये अनेक विकास काम सुरू आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ता करण्यात येत आहे. विप्रो कंपनीच्या शेजारी रस्त्यावरून अजित पवारांनी थेट रस्ता अडवणाऱ्याला इशारा दिला आहे.

रस्ता अडवणाऱ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ३५३ कलमानुसार गुन्हे दाखल करा, त्यांना उचला. असा आदेश अजित पवारांनी पोलीस प्रशासनाला दिला. ज्या व्यक्तींची जागा आहे. त्या व्यक्तींना योग्य मोबदला दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. हिंजवडीमध्ये अनेक ठिकाणी मेट्रो आणि पीएमआरडीच ढिसाळ नियोजन पाहण्यास मिळालं.

क्रोमा चौक येथे मेट्रो स्टेशनचा सरकता जिना चुकीच्या पद्धतीने उभारल्याचं अजित पवारांना काही जणांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी योग्य ती उपाययोजना करून वाहतूक कोंडी होणार नाही. यासाठी उपाय योजना करण्याचे पीएमआरडी आणि मेट्रो प्रशासनाला सांगितलं. त्या चौकातून दररोज लाखो आयटी अभियंते नोकरीला जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधी रस्ता मोठा होता. परंतु, मेट्रो स्टेशन उभारल्यानंतर रस्ता अगदीच अरुंद झाला आहे. यामुळे त्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होते. असं नोकरी करणाऱ्या आयटी अभियंत्यांनी अजित पवारांना सांगितलं. अजित पवारांच्या दौऱ्यानंतर हिंजवडीमधील रस्ता आणि वाहतूक समस्या सुटेल अशी अपेक्षा आयटी अभियंते व्यक्त करत आहेत.