पुणे : मतदारांना आपले मतदान केंद्र सहज शोधता यावे, यासाठी आणि तेथे पोहोचण्यास मदत होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र सुदूर संवेदन व उपयोजन केंद्र पुणेच्या (एमआरएसएसी) सहाय्याने ‘पी.एस. जिओपोर्टल’ विकसित केले आहे. मतदारांनी आपल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी या सुविधेचा उपयोग करावा आणि मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.

या संकेतस्थळावर पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ लोकसभा मतदार संघांतर्गत सर्व विधानसभा मतदार संघांतील मतदान केंद्रांची माहिती उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या सर्व मतदान केंद्रांचे एमआरएसएसीने जिओ टॅगिंग करुन ही प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये संगणकावर क्यूआर कोड किंवा https :// mahabhumi.mrsac.org.in /portal /apps /dashboards/ f804b371685d4b74ad6c34b37bd41c0c या युआरएल दुव्याच्या किंवा https://rb.gy/rp0e0r या लघुदुव्याच्या आधारे आपले मतदान केंद्राचे ठिकाण पाहता येईल. मोबाईलवर https:// mahabhumi.mrsac.org.in /portal/apps/dashboards/366148c2dff140efa5c6db2b69a52b0d या युआरएल दुवा किंवा https://rb.gy/2jqo87 या लघुदुव्याच्या आधारे आपले मतदान केंद्राचे ठिकाण पाहता येणार आहे.

हेही वाचा…अंगावरून साप गेला आणि आठ दिवसांनी शरद पवार मुख्यमंत्री झाले; सुप्रिया सुळे यांनी सांगितली ‘ती’ आठवण

या संकेतस्थळावर मतदाराला आपला विधानसभा मतदार संघ, त्यातील मतदान केंद्राचे नाव किंवा क्रमांक वापरुन त्याचे अचूक भौगोलिक स्थान नकाशावर दिसेल आणि दिसलेल्या ठिकाणी क्लिक केल्यास आपल्याला मतदान केंद्राची माहिती प्रदर्शित होईल. यात रकान्याच्या शेवटी ‘डायरेक्शन व्ह्यू’ या वर क्लिक केल्यास आपणास आपण उभे असलेल्या ठिकाणापासून मतदान केंद्रापर्यंतचा जाण्याचा मार्ग दिसेल, असे एमआरएसएसी पुणेचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा…पक्ष ओरबाडून घेण्यात मजा नाही; खासदार सुप्रिया सुळे यांचा अजितदादांना टोला, ‘मलाही मंत्री’ …

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदान केंद्रापर्यंत कसे जाल?

पीएस जिओ पोर्टलच्या दुव्यावर क्लिक केल्यानंतर उजव्या कोपऱ्यात विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्राचे नाव निवडावे. मतदान केंद्रावर क्लिक केल्यानंतर नकाशावर निळ्या रंगाचे मतदान केंद्राचे ठिकाण दिसेल. त्याला क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूस मतदान केंद्राचा तपशील येईल. त्यातील ‘डायरेक्शन’समोरील ‘व्ह्यू’ या शब्दाला क्लिक केल्यावर गुगल नकाशावार मतदान केंद्र शोधता येईल. संकेतस्थळाचा दुवा क्युआरकोडद्वारेही उघडता येईल.