पुणे : मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पंधरा मिनिटांत आग आटोक्यात आणली.

केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात खेळाचे साहित्य ठेवलेल्या ठिकाणी आग लागली होती. धूर मोठ्या प्रमाणात झाला. जवानांनी तातडीने आगीवर पाण्याचा मारा सुरू करत आग सुमारे पंधरा मिनिटांत आटोक्यात आणली. खेळाडू आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधत सर्वजण सुरक्षित असल्याची खात्री केली. यावेळी उपस्थित खेळाडू, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले.

हेही वाचा – बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात अल्कोहोलचा टँकर उलटला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगीत गाद्या, फोम, इलेक्ट्रिक वायर, संगणक, सीसीटीव्ही आणि कार्यालयातील अन्य वस्तूंचे नुकसान झाले. जिमनास्टिकचे साहित्य जळाले होते. आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता असून या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

हेही वाचा – पुणे : बेपत्ता शाळकरी मुलीची माहिती देणाऱ्या नागरिकांना पोलीस आयुक्तांकडून बक्षीस

अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी रमेश गांगड, सुनिल नाईकनवरे हनुमंत कोळी, शुभम करांडे, निलेश कदम तसेच जवान विनायक माळी, जितेंद्र कुंभार, अतुल खोपडे, आदींनी आग आटोक्यात आणली.