पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. शहराच्या मध्य भागातील प्रमुख रस्ते, तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्वरित मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

‘हे’ रस्ते बंद

शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, शास्त्री रस्ता, जंगलीमहाराज रस्ता (झाशीची राणी चौक ते खंडोजीबाबा चौक), कर्वे रस्ता (नळस्टाॅप चौक ते खंडोजीबाबा चौक), फर्ग्युसन रस्ता (खंडोजीबाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार), भांडारकर रस्ता (पीवायसी जिमखाना ते गोखले स्मारक चौक), पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक, देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक

हेही वाचा : इटलीच्या अ‍ॅना मारा या तरुणीने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक सादर करत जिंकली पुणेकरांची मने

पोलिसांचे आवाहन

विसर्जन मिरवणुकीत संशयित व्यक्ती किंवा बेवारस वस्तू आढळल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षात किंवा बंदोबस्तावरील पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader