पुणे : पिस्तुल बाळगणारा गुंड अटकेत; वारजे परिसरात गुन्हे शाखेची कारवाई

देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त

crime
(सांकेतिक फोटो)

बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या सराईतास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने वारजे परिसरात पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

लक्ष्मण येडबा शेंडगे (वय २३, रा. म्हाडा कॉलनी, वारजे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेंडगे सराइत असून त्याच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो वारजे भागाती म्हाडा कॅालनी परिसरात थांबला होता. त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अभिजीत पाटील आणि पथकाने सापळा लावून त्याला पकडले.

त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आले. शेंडगेची चौकशी करण्यात आली. शेंडगे भाजी विक्रीचा व्यवसाय करत असून चौकशीत त्याने स्वसंरक्षणासाठी बेकायदा पिस्तुल बाळगल्याची माहिती दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune hooligan carrying pistol arrested action of crime branch in warje area pune print news msr

Next Story
युरोपात जिभेच्या चोचल्यांसाठी बेडकांची आयात ; गेल्या वर्षी चार हजार टन पाय फस्त; इंडोनेशिया, तुर्कस्तानातील पर्यावरण धोक्यात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी