पुणे महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब बोडके विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या अविनाश बागवे आणि भाजपच्या राजेंद्र शिळीमकर यांचा पराभव केला. या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे आघाडीचा ‘नाशिक पॅटर्न’ चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. मनसेने या पदासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल न करता यासाठीचे पहिले पाऊल उचलले होते. दरम्यान, विधान परिषदेची पुण्यातील जागा टिकविण्यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेसला साथ द्यावी लागणार अशीदेखील चर्चा होती. मात्र, या निकालाने ही आशा मोडीत काढली.
संग्रहित लेख, दिनांक 5th Mar 2016 रोजी प्रकाशित
पुणे महानगरपालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब बोडके
या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे आघाडीचा 'नाशिक पॅटर्न' चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता
Written by लोकसत्ता टीम
First published on: 05-03-2016 at 13:33 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune mahanagar palika standing committee election