पुणे : उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाचा आधार घेऊन महापालिकेच्या बांधकाम विभागाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत त्रयस्थ व्यक्तीला माहिती देता येत नसल्याचे सांगून माहिती नाकारण्याचा प्रकार सुरू केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी नुकताच केला.

शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात त्रयस्थ व्यक्तीकडून प्राप्त झालेल्या तक्रारी, अर्ज, निवेदने अथवा धमकी विचारात घेऊ नये, असे परिपत्रक उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मध्यंतरी प्रसिद्ध केले. याचा आधार घेऊन, शहरात होणारी बांधकामे, त्यांच्या परवानग्या, टीडीआर, एफएसआयचा वापर यांसह अन्य गोष्टींबाबतची अधिकृत माहितीही त्रयस्थ व्यक्तीला माहिती अधिकारात देता येत नाही, असे सांगून नाकारली जात असल्याचा आरोप संभूस यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर म्हणाले, ‘राज्य सरकारने त्रयस्थ व्यक्तीला माहिती देऊ नये, असे परिपत्रक काढले आहे. त्याचा आधार घेऊन माहिती दिली जात नसावी. या परिपत्रकाचा अभ्यास केला जाईल, त्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल.’