पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या १० हजारांहून अधिक शालेय बस आणि व्हॅन आहेत. त्यापैकी दोन हजार १६२ वाहनधारकांनी अद्याप वाहन स्वास्थ तपासणी केली नसल्याची बाब समोर येत आहे. संबंधित वाहने सध्या शालेय विद्यार्थी वाहतूक करीत आहेत, किंवा नाही याची स्पष्टता नसल्याने दोन्ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून (आरटीओ) तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. अशी वाहने रस्त्यावर आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे शहरातील अधिकृत बस आणि व्हॅनची संख्या सात हजार १०३ आहे. पिंपरी-चिंचवडमधील बस आणि व्हॅनची संख्या तीन हजार १९५ आहे. दोन्ही शहरांत मिळून १० हजार २९८ बस आणि व्हॅनमधून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे. पुणे शहरातील पाच हजार ७००, तर पिंपरी चिंचवड शहरातील दोन हजार १३६ अशा एकूण आठ हजार १३६ वाहनांचे वाहन स्वास्थ्य प्रमाणपत्र अद्ययावत करण्यात आले आहे. उर्वरीत दोन हजार १६२ वाहनांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र अद्ययावत केलेले नाही, अशी माहिती आरटीओ कार्यालयांकडून देण्यात आली.

तसेच ज्या वाहनांचे अद्ययावतीकरण झालेले नाही, त्यापैकी किती वाहने बंद आहे किंवा अजूनही विना स्वास्थ्य तपासणी न करताच विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे, याची स्पष्टोक्ती नसल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. शहरात शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या अधिकृत १४०३ वाहनांची स्वास्थ्य तपासणी करून घेण्यात आलेली नाही. अशी वाहने विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहे किंवा नाही याबाबत तपासणी मोहीम हाती घेण्यात येत आहे. लवकरच अशा वाहनधारकांवर करवाई करण्यात येईल.स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी चिंचवड शहरातील २४३६ वाहनधारकांनी मुदतीत वाहन स्वास्थ्य तपासणी करून प्रमाणपत्र घेतले आहे. सुमारे ७५९ वाहनांची तपासणी झालेली नाही. या वाहनांमधून विद्यार्थी वाहतूक होत असल्यास वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी तपसणी करण्याचे आदेश दिले आहेत.संदेश चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड