पुणे : शिवसेनेच्या (शिंदे) युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश घारे यांच्या मोटारीवर गोळीबार केल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी तिघांना अटक केली. हे तिघे घारे यांच्या ओळखीचे असून, त्यांच्याबरोबर असलेला साथीदार पसार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन गोळे, शुभम खेमणार, अजय उर्फ बगली सकपाळ यांना अटक करण्यात आली आहे, संकेत मातले पसार आहे. घारे यांचे वारजे भागातील गणपती माथा परिसरामध्ये जनसंपर्क कार्यालय असून, १९ मे रोजी रात्री बाराच्या सुमारास त्यांच्या मोटारीच्या काचेवर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला.

त्या वेळी घारे कार्यालयात होते. याप्रकरणी घारे यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा वारजे पोलिसांसह गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री उशिरा गोळे, खेमणार, सकपाळ यांना वारजे भागातून ताब्यात घेण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीलेश घारे यांनीच गोळीबार करायला लावल्याची माहिती त्यांनी चौकशीत पोलिसांना दिली.‘नीलेश घारे यांच्या मोटारीवर झालेल्या गोळीबाराचा पोलिसांंकडून विविध शक्यता गृहीत धरून तपास करण्यात येत आहे. घारे यांनी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यांनी पोलीस संरक्षण मागितले होते. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी गोळीबाराचा बनाव रचला असावा. आरोपींचे घारे यांच्याशी वाद होता का, या दृष्टीनेही तपास करण्यात येत आहे. आरोपींची चाैकशी सुरू असून, चौकशीत या प्रकरणाचा उलगडा होईल,’ असे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.