पुणे : अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणात (आर्म ॲक्ट) गुन्हे दाखल झालेल्या गुंडांना मंगळवारी पोलीस आयुक्तालयात बोलावून सक्त ताकीद देण्यात आली.बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे.

हेही वाचा >>> कोणीही नाराज न होता महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा : नीलम गोऱ्हे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. गेल्या पाच वर्षात अशा स्वरुपाचे गु्न्हे दाखल झालेल्या सराइतांना मंगळवारी पुणे पोलीस आयुक्यालायत बोलावून घेण्यात आले. त्यांची झाडाझडती घेण्यात आली. गेल्या पाच वर्षात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ६१४ सराइतांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी १५० ते २०० गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालायात बोलावून त्यांना सक्त ताकीद देण्यात आली. गु्न्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी सराइताची माहिती संकलित केली. त्यांच्याकडून एक फाॅर्म भरून घेण्यात आला. गुन्हेगार वास्तव्यास असलेला भाग, पत्ता, नातेवाईक, साथीदारांची माहिती पोलिसांनी संकलित केली. शहरात गोळीबाराची घटना घडता कामा नये, अशी ताकीद त्यांना देण्यात आली. एखाद्याकडे पिस्तूल असेल तर, त्याची माहिती त्वरीत पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या सराइतांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांना दिले.