रॅगिंग सहन न झाल्याने दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १९ वर्षीय पीडित लोणावळ्यातील नामांकित महाविद्यालयात बीबीए.सीएच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. गेल्या आठवड्यात रॅगिंग सहन न झाल्याने तिला ब्रेन स्ट्रोक आला. तिच्यावर पिंपरी- चिंचवड शहरातील रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. पीडित मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे.

१९ वर्षीय पीडित इतर तीन मुलींसह लोणावळ्यात वसतिगृहावर राहण्यास आहे. तिन्ही मुली पीडितेला खूप त्रास द्यायच्या. बाथरूमध्ये कोंडले जायचं. तिच्या पाठीमागे चाकू घेऊन धावायचं. काही वेळा पीडितेला चाकू लागल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. तिच्या दिव्यांगावरून चिडवणे, टोमणे मारणे, असे काही तिन्ही मुली करायच्या. हा सर्व प्रकार दोन-तीन महिन्यांपासून सुरू होता. याबाबतची माहिती पीडितेने वडिलांना दिली. पैकी, एका मुलीच्या पालकांना पीडितेच्या वडिलांनी फोन केला. तुमची मुलगी माझ्या मुलीची रॅगिंग करते आहे, असं सांगितलं असता मी फौजी आहे, असे म्हणत त्यांनी उलट पीडितेच्या वडिलांना धमकावले. पीडितेने मुख्याद्यापीकेला तिन्ही मुलींची तक्रार केली. पण, उलट त्या मुलीचं करिअर खराब होईल असं तिला सांगून तक्रार करू नकोस असे सांगितलं. कुचंबणा झालेली पीडित मुलगी तणावात गेली. मुली खूपच मानसिक त्रास देत असल्याने १२ मार्च रोजी पीडितेला रात्री अकराच्या सुमारास ब्रेन स्ट्रोक आला, असा आरोप पीडितेच्या पालकांनी केला आहे. सध्या पीडितेवर पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…

हेही वाचा – नीट, एमएचटी-सीईटी एकाच दिवशी, सीईटी सेलवर दोनच दिवसांत पुन्हा वेळापत्रक बदलण्याची वेळ!

संबंधित तिन्ही मुलींवर रॅगिंग केल्याप्रकरणी कडक कारवाई करण्यात याशी, अशी मागणी पीडित मुलीच्या पालकांनी केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ही तक्रार करून न्याय देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा – विश्लेषण : वनखात्यातील अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण काय आहे? वनखात्याची भूमिका वादग्रस्त कशी?

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

रॅगिंग अ‍ॅक्ट प्रमाणे आम्ही चौकशी करत आहोत. पीडित तरुणीला बोलता येत नसल्याने चौकशीत पुढे जाऊ शकलो नाही. आज आम्ही पुन्हा प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी दिली.