पुणे : घरांच्या वाढलेल्या किंमती आणि गृहकर्जाचे वाढलेले दर असे चित्र या वर्षाच्या सुरुवातीला दिसून आले. तरीही घरांच्या विक्रीत यंदा मोठी वाढ नोंदविण्यात आली. देशातील प्रमुख सात महानगरांत यंदा ४ लाख ७६ हजार घरांची विक्री झाली असून, एकट्या पुण्यात ८६ हजार ६८० घरे विकली गेली आहेत. पुण्यातील घरांच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ५२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. अनारॉक ग्रुपने प्रमुख सात महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल गुरुवारी जाहीर केला. त्यात दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद या महानगरांचा समावेश आहे. या अहवालानुसार, यंदा मुंबईत सर्वाधिक १ लाख ५३ हजार ८७० घरांची विक्री झाली. त्याखालोखाल पुण्यात ८६ हजार ६८० घरांची विक्री झाली.

मागील वर्षी पुण्यात ५७ हजार १४५ घरांची विक्री झाली होती. यंदा देशातील घरांच्या बाजारपेठेत मुंबई आणि पुण्याने आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. याचबरोबर नवीन बांधकाम प्रकल्प सुरू होण्याचे प्रमाणही या दोन शहरांत जास्त आहे. एकूण नवीन प्रकल्पांपैकी तब्बल ५४ टक्के या दोन शहरांत आहेत. देशात पुढील वर्षात घरांच्या किमतीत सरासरी ८ ते १० टक्के वाढ अपेक्षित आहे. यंदा दुसऱ्या सहामाहीत व्याजदर स्थिर राहिल्याने ग्राहकांमध्ये सकारात्मक वातावरण कायम राहिले. देशातील महागाईचा दर सध्या स्थिर आहे. याचबरोबर आगामी काळात व्याजदरात वाढ होण्याची शक्यता नाही. भारतीय अर्थव्यवस्थेचीही जोरदार आगेकूच सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात घरांना वाढती मागणी राहणार आहे, असा अंदाज अहवालात वर्तविण्यात आला आहे.

kolhapur municipal corporation marathi news
कोल्हापूर शहराचे बकालीकरण करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलनाला सुरुवात
Plantation of 1100 trees by panvel municipal corporation
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पनवेल महापालिकेच्या ४८ उद्यानात ११०० वृक्षांचे रोपण
Tiger Safari in Chandrapur like Singapore Visit of 15 senior officers of Forest Department to Singapore and Dubai
सिंगापूरच्या धर्तीवर चंद्रपुरात ‘टायगर सफारी’! वनविभागाच्या १५ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सिंगापूर व दुबई दौरा
11th Admission, first merit list,
अकरावी प्रवेश प्रक्रिया : पहिली गुणवत्ता यादी २६ जून रोजी जाहीर होणार
11th admission form When to fill the second part of the 11th admission application form
अकरावी प्रवेशाच्या अर्जाचा दुसरा भाग कधी भरायचा, महाविद्यालयाचा पसंतीक्रम कसा देता येणार..
394 m additional central tunnel for bullet train completed
मुंबई : बुलेट ट्रेनसाठी ३९४ मीटरच्या अतिरिक्त मध्यवर्ती बोगद्याचे काम पूर्ण
Deccan Queen, birthday,
यंदा वाढदिवसालाच डेक्कन क्वीन रद्द, मुंबई – पुणे प्रवाशांचे हाल
Kolhapur, Kolhapur Municipal Corporation,
आरोग्य सेवा निर्देशांकामध्ये कोल्हापूर महानगरपालिका राज्यामध्ये प्रथम

हेही वाचा : नवीन कात्रज बोगद्यात अपघात; एक मोटार थांबली अन् चार मोटारी आदळल्या

घरांच्या किमतीत १३ टक्के वाढ

यंदा घरांच्या किमतीत सरासरी १० ते २४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. पुण्यात घरांच्या किमतीत १३ टक्के वाढ झाली आहे. पुण्यातील घरांचा सरासरी प्रतिचौरस फूट दर मागील वर्षी ६ हजार रुपये होता. यंदा तो वाढून ६ हजार ७५० रुपयांवर पोहोचला आहे. “यंदा घरांच्या किंमतीत वाढ होत गेली. त्यामुळे मागणीवर परिणाम होण्याची भीती होती. परंतु, व्याजदर स्थिर राहिल्याने ग्राहकांकडून खरेदीचा ओघ कायम राहण्यास मदत झाली”, असे अनारॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी म्हटले आहे.