पुणे : रेल्वे प्रवासी ज्येष्ठ महिलेचे दागिने प्रवासादरम्यान चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारदार ज्येष्ठ महिला शंकरशेठ रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला उद्यान एक्सप्रेसमधून कल्याण येथून निघाल्या. पुणे रेल्वे स्थानकात त्या उतरल्या. त्यानंतर त्या घरी पोहोचल्या. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी बॅग उघडून पाहिली तेव्हा बॅगेतून चार लाख ४८ हजार १०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आल्याचे उघडकीस आले. महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहायक फौजदार संतोष भापकर तपास करत आहेत.