अरुण फिरोदिया

Loksatta Pune Vardhapan Divas 2023 : पुण्याला उद्योग, शिक्षण, मनोरंजन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा वारसा लाभला आहे. त्याचा वापर करून पुण्याने स्वतःला घडवले पाहिजे. या दृष्टीने विचार केल्यास आगामी काळात पुण्याची ओळख ई सिटी असावी. ई म्हणजे इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, एज्युकेशन, एंटरटेन्मेंट, इक्वॅलिटी आणि एनलायटनमेंट. आता भविष्यात एका क्षेत्रावर आधारित काम न होता आंतरविद्याशाखीय पद्धतीने दोन किंवा अधिक क्षेत्रे म्हणून कामे होणार आहेत.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
udyog bhavan marathi news, udyog bhavan loksatta marathi news
‘उद्योग भवना’ची नऊ वर्षांनंतरही प्रतीक्षाच! विकासकाच्या इमारती मात्र विक्रीसाठी सज्ज, ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ पद्धतीत विकासक फायद्यात

हेही वाचा- चिंचवड पोटनिवडणूक: बंडखोर राहुल कलाटे यांचे समर्थक आणि भाजपा समर्थक एकमेकांना भिडले

गेल्या काही वर्षांत पुणे आणि परिसराची झालेली वाढ पाहता आता विकेंद्रित पद्धतीने शहर नियोजनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी शहराचा नव्याने विचार केला गेला पाहिजे. विकेंद्रित पद्धतीने शहर नियोजन करताना पाच लाख लोकसंख्येची उपनगरे विकसित करण्याची गरज आहे. ही उपनगरे भूमिगत वर्तुळाकार मार्गिकेने (रिंग रोड), उड्डाण पुलांनी जोडली पाहिजे. या विकसित होणाऱ्या परिसरात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यात शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, खरेदी, रेस्तराँ, क्रीडा अशा सुविधांचा समावेश असेल. त्याशिवाय प्रत्येक परिसर रोजगार निर्मिती करणारा असायला हवा. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी, आरोग्यसेवा, संशोधन, दुग्ध आणि अन्नप्रक्रिया उद्योग त्या परिसरात उभारले जावेत. प्रत्येक परिसराच्या प्रशासकीय आणि नियोजनात्मक देखभालीसाठी स्वतंत्र महापालिका असायला आणि या महापालिकांवर महानगर प्रदेश प्राधिकरणाचे नियंत्रण असू शकेल.

भविष्यातील शहराचा विचार करताना आताच्या पुणे शहराचे काय होऊ शकेल, काय करणे शक्य आहे हे विचारात घेतले पाहिजे. पुण्याला उद्योग, शिक्षण, मनोरंजन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा वारसा लाभला आहे. त्याचा वापर करून पुण्याने स्वतःला घडवले पाहिजे. या दृष्टीने विचार केल्यास आगामी काळात पुण्याची ओळख ‘ई सिटी’ असावी असे वाटते. ई म्हणजे इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, एज्युकेशन, एंटरटेन्मेंट, इक्वॅलिटी आणि एनलायटनमेंट. एनलायटनमेंट म्हणजे आध्यात्मिकता. तसे वातावरणही पुण्यात आहे. कारण पुण्याची जगात ओळख आचार्य रजनीश, अर्थात ओशोंमुळेही आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रातही पुण्याचे नाव मोठे आहे. व्ही. शांताराम यांच्यापासूनची परंपरा आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातील ‘झिंग झिंग झिंगाट’ आणि ‘नाटू नाटू’ या गाण्यात काय फरक आहे? पण ते आपल्या लक्षात आले नाही. मनोरंजनाच्या क्षेत्रात पुण्याने अधिक मोठ्या स्तरावर काम केल्यास पुण्याचे नाव अधिक मोठ्या पातळीवर जाईल. उद्योगासाठी आवश्यक असते ते इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकी. आताच्या काळात अभियांत्रिकीला इलेक्ट्रॉनिक्सची जोड देणेही गरजेचे आहे. कारखाने, वाहनांमध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हैदराबादची ओळख ‘सायबराबाद’ म्हणून करून दिली जाते. त्या धर्तीवर पुण्याने स्वतःची ई सिटी म्हणून ओळख निर्माण केली पाहिजे. आता भविष्यात एका क्षेत्रावर आधारित काम न होता आंतरविद्याशाखीय पद्धतीने दोन किंवा अधिक क्षेत्रे म्हणून कामे होणार आहेत.

हेही वाचा- Kasba By Election : कसब्यात नवमतदारांनीही बजावला मतदानाचा हक्क!

पूर्वीच्या काळात पिंपरी चिंचवडमध्ये उद्योग सुरू करणे ही चांगली कल्पना होती. त्यामुळे पुण्यावरचा ताण कमी झाला. कारण सुरुवातीला पिंपरी चिंचवडमध्ये राहण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे बरेच लोक पुण्याला राहात होते आणि कामाला पिंपरी चिंचवडला जात होते. कालांतराने प्राधिकरणाची निर्मिती झाली. आता तर वाकड, रावेत, बाणेर अशी उपनगरं विकसित झाली. त्यामुळे एका अर्थाने हा विकास आपोआप झाला. पण होणारे बदल लक्षात घेऊन बांधकाम व्यावसायिक, शिक्षण संस्थांनी नियोजन केले. त्यात सरकारी पातळीवरून फार काही नियोजन झाले होते असे वाटत नाही.

वाहनोद्योग हा देशातील पहिल्या क्रमांकाचा उद्योग आहे. सुदैवानं पुण्यात वाहनोद्योग फार मोठ्या प्रमाणात आहे. केवळ पिंपरी चिंचवडच नाही तर चाकणपर्यंत वाहन कंपन्या आहेत. वाहनोद्योगात सुटे भाग मोठ्या प्रमाणात लागतात. त्यामुळे वाहनोद्योगामुळे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या तयार झाल्या. त्यातून रोजगारनिर्मिती झाली. उद्योगांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. टाटांनी आपल्या उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ घडवण्यासाठी ॲप्रेंटिस योजना सुरू केली होती. त्यात तरुणांना प्रशिक्षित केलंं जायचं. त्या प्रशिक्षणाचा दर्जा इतका उत्कृष्ट होता, की इतर कंपन्यां त्या प्रशिक्षित तरुणांना नोकरीवर घेण्यासाठी उत्सुक असायच्या. अशा प्रशिक्षणाची आता गरज निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने उद्योगांनी मिळून एक केंद्र सुरू करून ॲप्रेंटिस योजनेसारख्या योजनेत तरुणांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करावी. त्यात अभियांत्रिकी पदवीधर किंवा अन्य तरुणांना उद्योगांची संपूर्ण माहिती देऊन प्रशिक्षित केलं जावं. त्यामुळे तरुणांना प्रत्यक्ष अनुभव मिळेल. एक वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमासारखा त्याचा आराखडा असावा.
आतापर्यंत पुण्याचा विकास आणि वाढ अनिर्बंध पद्धतीने झाली. त्याशिवाय आजूबाजूची गावे महापालिका क्षेत्रात समाविष्ट केली जातात. त्या गावांमध्ये सुविधा नसतात, रस्ते छोटे असतात. मात्र यात राजकारण खूप आहे. एक विमानतळ कुठे करायचा यात कितीतरी वर्षे गेली. पुण्यासारख्या शहराला स्वतंत्र विमानतळ नसणे ही खूप मोठी अडचण आहे. निर्यात वाढवण्यासाठी, बाहेरचे उद्योग येण्यासाठीही विमानतळ असणे अत्यावश्यक आहे. इतक्या वर्षांत पुण्यासाठी स्वतंत्र विमानतळ हवे ही दूरदृष्टी कोणीच दाखवली नाही. शहराचं दीर्घकालीन नियोजन झालं नाही ही फार मोठी चूक आहे. त्यासाठी काही उदाहरणं देता येतील. विद्यापीठासमोरील चौक हे त्याचे एक उदाहरण आहे. पाच रस्ते या ठिकाणी एकत्र येतात आणि आता तिथं होणारी वाहतूक कोंडी अत्यंत त्रासदायक झाली आहे. आता पुरंदरला विमानतळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण पुरंदर पुण्यापासून किती दूर आहे… पुरंदरला पोहोचण्याच्या वेळात मुंबईत पोहोचणं शक्य आहे. बाणेर, वाकडला राहणाऱ्या नागरिकाला पुरंदर विमानतळापेक्षा मुंबईला जाणं अधिक सोयीचं आहे. त्यामुळे विमानतळासाठी निवडलेली जागा चुकीची आहे असं माझं म्हणणं आहे. बऱ्याच वर्षांपासून रिंग रोडची चर्चा सुरू आहे. या रिंग रोडमुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न कमी होईल. पण अंतर्गत भाग रेल्वे किंवा मेट्रोने जोडले गेले पाहिजेत. अंतर्गत भागातही रस्ते करण्यामुळे गर्दी, प्रदूषण होईल.

हेही वाचा- पराभव दिसू लागल्याने अशांतता पसरविण्याचा प्रयत्न; खासदार श्रीरंग बारणे यांचा अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर आरोप

विद्यापीठे किंवा शिक्षण संस्थांना ज्या पद्धतीने स्वायत्तता दिली जाते, तशी स्वायत्तता उद्योगांनाही दिली पाहिजे. एमआयडीसीतील उद्योगांचे व्यवस्थापन महापालिकेने करण्यापेक्षा एमआयडीसीने आणि उद्योगांनीच केले पाहिजे. सुरक्षा व्यवस्था शासनाने उपलब्ध करून द्यावी. पण बाकीच्या गोष्टीतील राजकीय हस्तक्षेप कमी करून उद्योगांना स्वायत्तता मिळायला हवी. वीस वर्षांपूर्वी मी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचा अध्यक्ष असताना कॉमन एफ्ल्युंटर ट्रिटमेंट प्लँटची (सीईटीपी) संकल्पना मांडली होती. ती संकल्पना आता कुठे प्रत्यक्षात येत आहे. या सुविधेमुळे सांडपाण्यावर प्रक्रिया आणि त्याचं व्यवस्थापन करणं शक्य होईल. उद्योगांमुळे होणारं प्रदूषणही कमी होऊ शकेल. उद्योगांना कायमस्वरूपी वीजपुरवठाही नीट मिळत नाही, त्याकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे.

सध्या आपल्याकडे पुढील तीस वर्षांचा कालावधी विचारात घेऊन विकास कामे केली जातात. मात्र पूर्वीचं वैभव आपल्याला मिळवायचं असेल, तर आपल्याला पुढील शंभर वर्षांचा विचार केला पाहिजे. पूर्वी आपल्याकडे जगाला ज्ञान देण्याची क्षमता होती. दरम्यानच्या काही वर्षांत परिस्थिती बदलली. पण आता आपल्याला विश्वबंधुत्व मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल हे विचारात घेऊन एकूण नियोजन करण्याची आवश्यकता आहे. आपण प्रगती, विकास सहजसाध्य करू शकतो, पण सरकारने प्रशासकीय आडकाठी न करता लोकांना ते करण्यासाठी मुभा द्यायला हवी.

(लेखक ज्येष्ठ उद्योगपती आहेत)