पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांची शहरातील संस्था संघटनांच्या वतीने विविध उपक्रम राबवून सेवा करण्यात आली. वारकऱ्यांसाठी चहा, फराळ आणि नाश्त्यासह आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या.

सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्ट यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराचे विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अमिता अग्रवाल, हेमंत अर्नाळकर, मिलिंद राहुरकर या वेळी उपस्थित होते.

डीएसके विश्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ‘मनामनाची मशागत करणारा वारकरी संप्रदाय’ या विषयावर संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर यांचे व्याख्यान आणि चारुशीला बेलसरे यांनी ‘पांडुरंगी मन रंगले’ या अभंगांवर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रत्नाकर फाटक, तेजस्विनी शिरोडकर, विनायक जोशी या वेळी उपस्थित होते.

जान्हवी फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांसाठी भवानी पेठेत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात सुमारे १७० वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विक्रम गायकवाड, डॉ. शुभांगी गायकवाड, नीलेश सोनवणे, रेखा बोरकर, संदीप उंबरे, ओंकार साळुंके, संहिल शेख, अक्षय खागटे-पाटील या वेळी उपस्थित होते.

बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने बाजीराव रस्त्यावरील टेलिफोन भवन येथे ५०० वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्थेसह ‘हँडबॅग’चे वाटप करण्यात आले. किशोर गवळी, मधुकर कामठे, सुनील सोनावणे, दिलीप मगर, संतोष हरगुडे, विजय मोरे, राजेश जाधव, दिलावर शेख, हिमांशु हिरे या वेळी उपस्थित होते.

पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हस्ते मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते. काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, बाळासाहेब अमराळे, अक्षय जैन, ॲड. विवेक गावंडे, विवेक कडूू, सद्दाम शेख, कुणाल काळे, स्वप्नील गायकवाड या वेळी उपस्थित होते.

हडपसर येथील स्त्री-सखी स्वयंम रोजगार संस्थेच्या वतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा वासंती काकडे, पुष्पा गायकवाड, सुवर्णा भिसे, शैला शिंदे, सुवर्णा नेलेकर या वेळी उपस्थित होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आझाद युवक तरुण मंडळाच्या वतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष इंद्रसेन काकडे, ईशान तुपे, हर्षद तुपे, दिनेश तुपे, कुमार तुपे या वेळी उपस्थित होते.