आपल्या प्रकृतीची तमा न करता गाडीतील २५ प्रवाशांना सुखरूप करून एसटी चालकाने प्राण सोडले. चालक जालिंदर पवार ( वय ४५, रा. पळशी, ता. खटाव, जि. सातारा) या चालकाच्या जिगरबाज वृत्तीचे कौतुक होत आहे. “शो मस्ट गो ऑन’ असे म्हणत दुसऱ्या चालकासह एसटी पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली.

एखाद्या चित्रपटात शोभेल अशी ही करूण कहाणी सर्वांना चटका लावून गेली. प्राणापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ याची प्रचिती जालिंदर पवार यांनी आपल्या कृतीतून दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसई-म्हसवड ही गाडी ३ ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास स्वारगेट स्थानकात आली. तेथे चालकाची बदली झाली आणि जालिंदर पवार यांच्याकडे गाडीचा ताबा आला. २५ प्रवाशांसह गाडी खेड शिवापूर टोलनाक्याजवळ वरवे गावाच्या हद्दीत आल्यावर गाडीचा वेग कमी झाला.त्यावेळी वाहक संरोष गवळी यांनी केबिनमध्ये जाऊन जालिंदर यांची विचारपूस जेली. जालिंदर घामाने चिंब झाले होते. दोन वाक्य पुटपुटत जालिंदर यांनी स्वतःवर ताबा ठेवत गाडी रस्त्याच्या कडेला नेत २५ प्रवाशांचे प्राण सुरक्षित केले आणि स्टीअरिंगवरच डोके ठेवून ते शांतपणे बसले. एका प्रवाशाने गाडी नसरापूर येथील रुग्णालयात नेली. तोपर्यंत उशीर झाला होता. जालिंदर यांचे निधन झाल्याचे डॉकटरांनी जाहीर केले.