scorecardresearch

Premium

सहायक प्राध्यापक पदासाठीची सेट परीक्षा ७ एप्रिलला; परीक्षेत आता होणार मोठा बदल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा (सेट) ७ एप्रिलला होणार आहे.

pune university set exam, set exam for assistant professor, set exam on 7 th april
सहायक प्राध्यापक पदासाठीची सेट परीक्षा ७ एप्रिलला; परीक्षेत आता होणार मोठा बदल (संग्रहित छायाचित्र)

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा (सेट) ७ एप्रिलला होणार आहे. पारंपारिक पद्धतीने (ऑफलाइन) होणारी ही शेवटची परीक्षा असून, या पुढील परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे आणि सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी १९९५पासून सेट परीक्षा विद्यापीठामार्फत घेतली जाते. एकूण ३२ विषयांसाठी ही परीक्षा घेण्यात येते.

हेही वाचा : प्रेमविवाहाची इच्छा अधुरी, ट्रकचालकाचा अपघाती मृत्यू; तरुणी गंभीर जखमी

Arrange to show Prime Ministers Pariksha Pe Charcha programme Education Department orders
पंतप्रधानांचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम दाखवण्याची व्यवस्था करा, शिक्षण विभागाचा आदेश
Opportunity for education
शिक्षणाची संधी
Concerned about students understanding of mathematics A growing trend towards smartphones
गणिताविषयी विद्यार्थ्यांची आकलनशक्ती चिंताजनक? स्मार्टफोनकडे वाढता कल? काय आढळले ‘असर’च्या पाहणीत?
mumbai university declared result of Law Faculty After 110 days
मुंबई विद्यापीठातर्फे ११० दिवसांनंतर विधी शाखेचा निकाल जाहीर; विधी शाखा तृतीय सत्र परीक्षेत ५७.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

१७ शहरांमधील सुमारे २६२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. कोणत्याही विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवीला ५५ टक्के गुण (राखीव ५० टक्के) प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना आणि शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अर्ज भरता येणार आहे. इंग्रजी आणि मराठी या दोन माध्यमात ही परीक्षा देता येणार आहे. मार्चमध्ये झालेल्या ३८व्या सेट परीक्षेसाठी सुमारे १ लाख २५ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune university set exam for the post of assistant professor on 7 th april pune print news ccp 14 css

First published on: 30-11-2023 at 10:37 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×