पुणे : पुण्यातील तरुणाचा आसाममधील गुवाहाटी शहरात खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह दोघांना अटक केली आहे. अनैतिक संबंधातून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संदीप सुरेश कांबळे (वय ४४, रा. येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अंजली शाॅ, विकासकुमार शाॅ यांना अटक करण्यात आली आहे. संदीप याचा गुवाहाटी शहरातील तारांकित हाॅटेलमध्ये सोमवारी (५ फेब्रुवारी) मृतदेह सापडला. याप्रकरणाचा तपास गुवाहाटी पोलिसांकडून करण्यात आला.

तपासात पश्चिम बंगालमधील महिलेसह तिच्या साथीदाराने कांबळे याचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने अंजली आणि तिचा साथीदार विकासकुमार यांना अटक केली. आरोपी अंजलीची संदीप याच्याशी कोलकात्ता येथील विमानतळावर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. अंजली त्याला पुण्यात भेटण्यासाठी नेहमी यायची. संदीप कोलकात्ता येथे तिला भेटण्यासाठी जायचा त्यांनी तिला विवाहाबाबत विचारणा केली होती. संदीपला तेरा वर्षांची मुलगी आहे.

हेही वाचा : पुणे जिल्ह्यात दुसरे विमानतळ कधी होणार? खासदार श्रीरंग बारणे यांच्या हिंदीतील प्रश्नावर ज्योतिरादित्य सिंधिया मराठीत म्हणाले…

अंजलीने विवाहास नकार दिल्यानंतर तो चिडला. त्याने अंजलीच्या नातेवाईकांना छाायाचित्रे पाठविली. त्यामुळे अंजलीच्या कुटुंबीयानी तिला जाब विचारला. या प्रकाराची माहिती तिने मित्र विकासकुमारला दिली. विवाहासाठी संदीप तिच्यावर दबाब आणत होता. तिला त्रास देत होता. त्यामुळे तिने मित्राची मदत घेऊन संदीपचा खून करण्याचा कट रचला. तिने संदीपला गुवाहाटीत भेटायला बोलावले. संदीपने तारांकित हाॅटेलमध्ये खोली घेतली. अंजलीने तिचा मित्र विकासकुमारसाठी तारांकित हाॅटेलमध्ये एक खोली आरक्षित केली. संदीप गुवाहाटीत पोहोचल्यानंतर अंजली त्याला भेटली. तेव्हा तिने छायाचित्रे प्रसारित का केली, अशी विचारणा केली. छायाचित्रे समाजमाध्यमातून हटवण्याची मागणी तिने केली. तेव्हा त्याने नकार दिला. त्यानंतर तिने मिठाईतून त्याला गुंगीचे ओैषध दिले. त्यानंतर तेथे विकास आला.

हेही वाचा : कोथरूडमधील थोरात उद्यानात मोनोरेल; प्रकल्पाला पुणेकरांचा विरोध… जाणून घ्या कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकासने त्याला मारहाण केली. जखमी अवस्थेतील संदीपला हाॅटेलमधील खोलीत सोडून अंजलीआणि विकास पसार झाले. संदीप बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. कोलकात्याला पसार होण्याच्या तयारीत असलेल्या अंजली आणि तिचा साथीदार विकासला गुवाहाटीतील कामाख्या रेल्वे स्थानकाच्या आवारात पकडले.