पुणे : परगावी निघालेल्या तरुणीला धमकवून शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उगडकीस आली आहे बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत.

दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५,, रा. शिक्रापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले पीडित २६ वर्षाची तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली. तिला एकाने फलटणला जाणारी गाडी इकडे लागत नाही़ तिकडे लागते, असे सांगितले. त्यावर या तरुणीने इकडेच फलाटावर लागते, असे सांगितले. त्यावर त्याने तिच्याशी गोड बोलून तिला मी १० वर्षे इथे आहे. तिकडे लागणारी बसच फलटणला जाते, असे सांगून तिला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. बसमध्ये अंधार होता. तेव्हा त्याने तुम्ही दरवाजा उघडून आत जा, असे सांगितले. तेव्हा ही तरुणी बसमध्ये गेली. तेव्हा तिच्या मागोमाग तो आत आला. त्याने दरवाजा लावून घेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर ही तरुणी फलटणला जाण्यास निघाली. अर्ध्या वाटेवरुन ती परत आली आणि तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली स्वारगेट पोलिसांनी तातडीने तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. चित्रीकरणात आरोपी निष्पन्न झाला आहे. त्याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल