आगामी महापालिका निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम सुरू असताना समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना रविवारी घडली. या घटनेत तिघे जण जखमी झाले असून रात्री उशिरा या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोन्या खंडागळे, मोन्या खंडागळे, तोहित काझी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रसाद प्रकाश शेलार यांनी या संदर्भात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ प्रभागातून प्रेम शेलार आणि रेखा चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू असताना समर्थकांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. प्रसादशेलार आणि दोन कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोक्यात झेंड्याचा लोखंडी पाइप घातल्याने ते जखमी झाले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Dec 2016 रोजी प्रकाशित
पुण्यात राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी
यात तिघे जखमी झाले असून रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 18-12-2016 at 22:51 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtravadi congress aspirant candidate of pune municipal corporation election beaten each other