पुणे : पुणे शहरातील विविध प्रलंबित प्रकल्पांबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ही बैठक विशेष अर्थाने चर्चेत राहिली. या बैठकीला कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हजेरी लावली होती. पण या बैठकीवर रवींद्र धंगेकर यांनी बहिष्कार टाकत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्या घटनेनंतर रवींद्र धंगेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, माझ्यावर चंद्रकांत पाटील नाराज आहेत. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला निमंत्रण नसलेली व्यक्ती बैठकीत आली होती. बैठकीमधील एकूणच परिस्थिती पाहता बैठकीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितले.
या बैठकीतील घडामोडींबाबत चंद्रकांत पाटील
तसेच ते पुढे म्हणाले की, त्यांना फोन आला असावा म्हणून ते बाहेर गेले अन्यथा मी धंगेकरांना एक फोन केला असता असे त्यांनी सांगितले. ‘रात गयी बात गयी’, निवडणुक झाली आहे. ते आता आमदार झाले आहेत. रवींद्र धंगेकर यांनी घरी जेवायला बोलावलं तर मी नक्की जाईन अशी भूमिका त्यांनी यावर मांडली.