बारामती : चालत्या मोटारसायकलवर चार मिनीट आणि वीस सेकंदांमध्ये दहा सूर्यनमस्कार बारामतीच्या रोहित शिंदे या युवकाने घातले आहेत. त्याच्या या कामगिरीची नोंद इंडिया बुक रेकाॅर्ड आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.  मोटारसायकलवर दहा वेळा सूर्यनमस्कार घालणारा तो जगातील पहिला मोटारसायकलस्वार ठरला आहे.

हेही वाचा >>> “उद्धव ठाकरे, अजित पवारांसह अनेकांचे फोन आले, पण मी माघार घेणार नाही, कारण…”, राहुल कलाटेंच्या घोषणेने मविआला धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वयाच्या १६ व्या वर्षापासून मोटारसायकल रेस करणाऱ्या रोहितने रथसप्तमी म्हणजेच जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून २८ जानेवारी रोजी चालत्या मोटारसायकलवर दहा सूर्यनमस्कार घालण्याची कामगिरी केली. गेल्या १२ वर्षांमध्ये त्याने देशभरात तीनशेहून अधिक मोटारसायकल रायडिंग केले आहेत. हा छंद स्वत:पुरता मर्यादित न ठेवता त्याने अनेक युवकांना मोटार सायकल रायडींगचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मोटारसायकल स्टंटमध्ये मोटोक्रॉस, स्टंट रायडींग ऑफ रोडींग, ऍटोक्रॉस आणि रॅलीमध्ये उत्तुंग कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या झारखंडमधील रांची येथे मोटार सायकल रायडींगमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. केटीएम कंपनीच्या आरसी तीनशे नव्वद सीसी गाडीवर रेस जिंकून चेन्नई येथे होणाऱ्या ट्रॅक रेसिंग राष्ट्रीय स्पर्धेसाठी रोहितची निवड झालेली आहे. यामध्ये प्रथम दहामध्ये येणार्‍यास ऑस्ट्रिया केटीएम ग्लोबल हेडक्वॉटर स्पर्धेत भाग घेता येणार आहे असे बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष सुमित नारंग यांनी सांगितले.