पुणे: बासमती तांदूळ हा त्याच्या अनोख्या चवीमुळे ओळखला जातो. आता या तांदळात इतर तांदळाचे मिश्रण करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. यासाठी कंपन्यांना पॅकिंगवर इतर तांदळाचे प्रमाण द्यावे लागेल. त्यातून बासमती तांदळाच्या नावाखाली होणारी इतर मिश्र बासमती तांदळाची विक्री रोखण्याचा उद्देश आहे.

बासमती तांदळासाठी भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) नवीन नियमावली १ ऑगस्टपासून लागू केली आहे. याबाबत इंडिया गेट बासमती राईस कंपनीच्या वतीने जनजागृतीपर मोहीम सुरू करण्यात आली आहे. या वेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त सुरेश अन्नापुरे, बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. नारायण हेगडे, आयसीएआर-एनआरसीजी संस्थेतील प्रधान शास्त्रज्ञ डॉ. सुजय साहा, शेफ सचिन जोशी आणि केआरबीएल कंपनीचे कुणाल शर्मा आदी उपस्थित होते.

cold water sold in the name of mineral water
मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री ! शासकीय यंत्रणा ढिम्म
tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?

हेही वाचा… पुणे : सिंहगड रस्त्यावर दुचाकी विक्री दालनात आग; २० ते २५ दुचाकी जळाल्या

या वेळी सहआयुक्त अन्नापुरे म्हणाले, की आधी बासमती तांदळात इतर तांदळाची भेसळ केली जात होती. बासमती तांदूळ हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्याच्यात इतर तांदळाची भेसळ करून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. बासमती तांदळात इतर तांदूळ मिसळण्याचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत निश्चित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर त्या तांदळाच्या पॅकिंगवर ब्लेंडेड म्हणजेच बासमती मिश्र असा उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर बासमती तांदूळ आणि इतर तांदूळ यांचे प्रमाणही पॅकिंगवर द्यावे लागेल.

सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार

बासमती मिश्र तांदूळ हा बासमती तांदळापेक्षा कमी किमतीत ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. बासमती तांदळाची किंमत जास्त असल्याने तो सर्वसामान्य ग्राहकांना परवडत नाही. बासमती मिश्र तांदळामुळे ग्राहकांना तो कमी किमतीत मिळेल आणि त्यात पारदर्शकताही असेल, असे अन्नापुरे यांनी नमूद केले.