पुणे : नवी पेठेतील पूना हाॅस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा दूरध्वनी आल्यानंतर घबराट उडाली. गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी रुग्णालयाची पाहणी केली. तेव्हा बॉम्बसदृश वस्तू सापडली नाही.

हेही वाचा – यंदाचा पावसाळा धुव्वाधार?  राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात या महिन्यात पावसाचा अंदाज

हेही वाचा – मराठा सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही; मागासवर्ग आयोगाची स्पष्टोक्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूना हाॅस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी पोलीस नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रुम) गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास आला. या घटनेची माहिती विश्रामबाग पोलीस, तसेच बॉम्ब शाेधक पथकाला देण्यात आली. बॉम्बच्या अफवेमुळे परिसरात घबराट उडली. बॉम्ब शोधक पथकाने परिसराची तपासणी केली. संशयास्पद वस्तूंची तपासणी केली. मध्यरात्रीपर्यंत तपासणी करण्यात आली. बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. खोडसाळपणे पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.