लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : हस्तलिखिते हा भारतीय ज्ञान परंपरेचा प्राचीन आणि सर्वात मोठा स्त्रोत आहे. अशा काही हस्तलिखितांचा संग्रह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत आणि प्राकृत विभागामध्ये आहे. उदयपूर येथील ना – नफा तत्वावर काम करणाऱ्या धरोहर या संस्थेने या हस्तलिखितांची संगणकीय विवरणात्मक सूची करण्यासाठी दिलेला प्रस्ताव विद्यापीठ अधिकार मंडळाने हा प्रस्ताव मान्य केला असून, हस्तलिखितांच्या संगणकीय विवरणात्मक सूचीसाठी शनिवारी सामंजस्य करार करण्यात आला.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, धरोहर संस्थेचे संचालक संजय सिंघल यांनी करारावर स्वाक्षरी केली. प्र – कुलगुरु प्रा. पराग काळकर, कुलसचिव प्रा. विजय खरे, प्रा. संजय ढोले, माजी कुलसचिव कॅप्टन चितळे, संस्कृत प्राकृत विभागाचे विभागप्रमुख प्रा. देवनाथ त्रिपाठी, माजी विभागप्रमुख प्रा. रवींद्र मुळे, प्रा. विनया क्षीरसागर या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा- पिंपरी- चिंचवड: ‘त्या’ नऊ निष्पाप जीवांचा बळी कुणी घेतला? पोलीस की महानगरपालिका..!

प्राचीन ग्रंथाचे संरक्षण आणि जतन करून त्यातील माहिती पुनरूज्जीवित करून आधुनिक संदर्भात संशोधनासाठी नव्याने उपलब्ध करून देणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रा. गोसावी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धरोहर संस्थेने इतर संस्थाकडील हस्तलिखितांच्या प्रतिमा मिळवून संगणकीय सूचीचे काम सुरू केले आहे. त्यात पावणेआठ हजार हस्तलिखितांची सूची http://www.sangrah.org या आंतरजालीय संकेतस्थळावर संस्कृत अभ्यासक, संशोधकांसाठी उपलब्ध असल्याची माहिती सिंघल यांनी दिली. भारतीय ज्ञानाचा आणि प्रसारासाठी कार्यरत असलेल्या धरोहर संस्थेला विद्यापीठाच्या संस्कृत प्राकृत विभागाने हस्तलिखिते उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.