पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णालयात रुग्णांची संख्या जास्त असतानाच न्यायवैद्यक प्रकरणांचा भारही ससूनवर वाढला आहे. हा भार कमी करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. हडपसर आणि वानवडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील न्यायवैद्यक प्रकरणे आता सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) पाठविण्यात येणार आहेत.

पुणे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील न्यायवैद्यक प्रकरणे ससून रुग्णालयात पाठविली जातात. ससूनवर आधीच जास्त रुग्णसंख्येचा ताण असताना हा भारही दिवसेंदिवस वाढत होता. यामुळे औंधमधील जिल्हा रुग्णालय, पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आणि वानवडीतील एएफएमसी रुग्णालयात न्यायवैद्यक प्रकरणे पाठविण्यात यावीत, अशी मागणी ससून रुग्णालयाकडून करण्यात येत होती. ससून रुग्णालयावरील न्यायवैद्यक प्रकरणांचा ताण वाढल्याने त्यांचे अहवाल मिळण्यासही विलंब होत होता.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा…“…तर आम्ही त्याला ठोकून काढल्याशिवाय सोडणार नाही”, मनसे उमेदवार मयुरेश वांजळेंचा इशारा

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी काही दिवसांपूर्वी या प्रकरणी बैठक घेतली. त्यावेळी इतर रुग्णालयांत न्यायवैद्यक प्रकरणे पाठविण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी याबाबत नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत वानवडी आणि हडपसर पोलीस ठाण्यातील न्यायवैद्यक प्रकरणे एएफएमसीमध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. अतिरिक्त आयुक्तांनी याबाबतचे पत्र हडपसर, वानवडी पोलीस ठाण्यांसोबत एएफएमसी आणि ससूनला पाठविले आहे.

पत्रात नेमके काय…

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी पत्रात म्हटले आहे की, वानवडी व हडपसर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सर्व न्यायवैद्यक प्रकरणे हाताळण्यासाटी एएफएमसीला प्राधिकृत करण्यात आले आहे. यात न्यायवैद्यकीय शवविच्छेदन, वयनिश्चिती, जखमांचे अहवाल, सक्षमता तपासणी आदी प्रक्रियांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने याबाबतचा शासन निर्णयही घेतला होता. या पत्रानुसार दोन्ही पोलीस ठाण्यांनी कार्यवाही करावी.

हेही वाचा…पोलीस असल्याच्या बतावणीने ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक, कारवाईची भीती दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढीस

ससून रुग्णालयातील रुग्णसंख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. त्यातच न्यायवैद्यक प्रकरणांचा भारही ससूनवर आहे. तो कमी करण्यासाठी आता पावले उचलली जात आहेत. पुढील काळात इतर रुग्णालयांवर न्यायवैद्यक प्रकरणांची जबाबदारी सोपविण्यासाठी पत्रव्यवहार केला जाणार आहे. – डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय

न्यायवैद्यक तपासण्या

न्यायवैद्यकीय शवविच्छेदन
वयनिश्चिती
जखमांचे अहवाल
सक्षमता तपासणी

Story img Loader