पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त शहरात चार हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यानिमित्त पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली असून शहरात पालख्यांचे आगमन २२ जून रोजी होणार आहे.

हेही वाचा >>> देहू, आळंदी पालखी मार्गावर ड्रोनद्वारे छायाचित्रणास प्रतिबंध; आदेशाचे उल्लंधन केल्यास होणार कारवाई

करोना संसर्गामुळे गेले दोन वर्ष पालखी सोहळ्याची परंपरा खंडीत झाली होती. श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र देहू येथून २० जून रोजी तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथून २१ जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. दोन्ही पालख्यांचे आगमन शहरात २२ जून रोजी सायंकाळी होणार आहे. २३ जून रोजी पालखी सोहळा शहरात मुक्कामी राहणार असून २४ जून रोजी पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे.

हेही वाचा >>> यंदा वारीत महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक विशेष सोयीसुविधा, महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ अभियानाचा पुण्यातून प्रारंभ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालखी सोहळ्यासाठी शहरात चार हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विशेष शाखेकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यात साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गुन्हे शाखेची पथके बंदोबस्तात राहणार आहेत. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तसेच गृहरक्षक दलाचे ६०० जवान बंदोबस्तास असतील.