संतसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखिका डॉ. वसुंधरा बनहट्टी (वय ८०) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पती, तीन मुली, मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांच्या पत्नी तर, डॉ. ललितागौरी कुलकर्णी, डॉ. पद्मिनी गुमास्ते, पूर्णिमा बनहट्टी, पुत्र आणि सुविचार प्रकाशन मंडळाचे प्रकाशक चैतन्य बनहट्टी यांच्या मातोश्री होत.

डॉ. वसुंधरा बनहट्टी यांनी संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथ, संत सखु, संत सोयराबाई, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई, संत जनाबाई आणि समर्थ रामदास या संतांवर आणि त्यांच्या साहित्यावर अभ्यासपूर्ण लेखन केले होते. त्यांचे लेखन प्रसाद, युगबोध, रसिक या नियतकालिकामधून प्रसिद्ध झाले. ‘श्री ज्ञानदेवांच्या अभंगातील शब्दसंपत्ती’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली होती. ज्ञानदेवांच्या अभंगातील शब्दकळा, संत येती घरा, समर्थ रामदासः वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व, मैत्री श्रीदासबोधाशी, सहचर, एकनाथी भागवतातील वाङ्मय सौंदर्य, संतांची मांदियाळी ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. बनहट्टी प्रामुख्याने संतसाहित्याच्या अभ्यासक असल्या तरी त्यांनी कविता, कथा, समीक्षा, प्रवासवर्णन, ललितवाङ्मय हे साहित्य प्रकारही हाताळले आहेत.