अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते. “सिंधुताई सपकाळ यांचं आज (४ जानेवारी) रात्री ८ वाजून १० मिनिटांनी गॅलेक्सी रुग्णालयात हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर काही दिवसापूर्वी शस्त्रक्रिया देखील झाली होती,” अशी माहिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंधुताई यांच्या पार्थिवावर बुधवारी (५ जानेवारी) दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्या अगोदर हडपसर येथील त्यांच्या संस्थेत नागरिकांना अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवले जाणार आहे. सिंधुताई यांच्या निधनाची बातमी येताच सर्वच स्तरातून दुःख व्यक्त केलं जात आहे. तसेच त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली जात आहे.

Photos: हुंदके, सांत्वन, डोळ्यात पाणी अन् नजर जाईल तिथपर्यंत रांग; सिंधुताईंच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी

कोण होत्या सिंधुताई सपकाळ?

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म वर्धा येथे झाला. घरात मुलगी नको असताना त्यांचा जन्म झाल्याने त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली. त्यांना मराठी शाळेत चौथीपर्यंतच शिकता आलं. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न करून देण्यात आलं. मात्र, त्यानंतरही त्यांचा संघर्ष सुरूच राहिला.

पुढे सिंधुताई यांनी १९९४ मध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावात ममता बाल सदन संस्था सुरू केली. स्वतःची मुलगी ममताला त्यांनी दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून सेवासदन येथे शिक्षणासाठी दाखल केले. तसेच स्वतः इतर अनाथ आणि बेवारस मुलांचा सांभाळ करत आधार दिला. या ठिकाणी त्यांनी लहान मुलांच्या पालनपोषणासह शिक्षणाचीही जबाबदारी स्विकारली.

Video: ‘चिंधी’ ते पद्मश्री पटकावणारी अनाथांची माय… असा होता सिंधुताई सपकाळ यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

अनाथांच्या शिक्षणापासून आर्थिक स्वावलंबनापर्यंत मोलाचं काम

सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेकडून अनाथ मुलांना जेवण, कपड्यासह इतर अनेक सुविधा दिल्या जायच्या. या कामासाठी लोकही सढळ हाताने मदत करायचे. याशिवाय मुलांना शिक्षण पूर्ण झाल्यावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी देखील मार्गदर्शन केले जात होते. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यावर या अनाथ मुलांना जोडीदार शोधणे आणि लग्न करणे यातही सिंधुताई सपकाळ यांचा सक्रीय सहभाग होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior social worker sindhutai sapkal passes away in pune pbs
First published on: 04-01-2022 at 22:38 IST