पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसेंचे जावई आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना पुणे शहरातील खराडी परिसरातील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी केल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान अटक करण्यात आली आहे.या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

प्रांजल खेवलकर,निखिल पोपटाणी,समीर फकीर मोहम्मद सय्यद, सचिन भोंबे,श्रीपाद यादव आणि दोन महिला असे एकूण सात जणांना पुणे न्यायालयामध्ये हजर केले असता, सरकारी आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर 29 जुलैपर्यत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील युक्तीवाद करतेवेळी म्हणाले,आरोपींकडे कोकिन,गांजा पदार्थ मिळून आले आहेत.हे सर्व पदार्थ कुठून खरेदी केले आहेत.यातून काही आर्थिक व्यवहार झालेत का ? याबाबत तपास करायचा असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

त्यावर आरोपीचे वकीलाकडून युक्तीवाद करतेवेळी सांगण्यात आले की ,प्रांजल खेवलकर यांनी अमली पदार्थ सेवन केले नाही किंवा त्यांनी विकत आणले नाही.तसेच ही बाब वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होईल. त्यामुळे प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळावा,अशी मागणी केली.या मागणीवर सरकारी वकिलांनी सर्व आरोप खोडून काढले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 2.70 ग्राम कोकेन सदृश्य पदार्थ,70 ग्राम गांजा सदृश्य पदार्थ, हुक्का पॉट,दारू, बिअर बॉटल ,10 मोबाईल आणि दोन चार चाकी वाहन असे एकूण 41 लाख 35 हजार 400 रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.