पुणे शहरातील शनिवारवाडय़ात दोन दिवसापूर्वी मुस्लिम महिलांनी नमज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, भाजपच्या नेत्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आज दुपारी साडे चार वाजण्याच्या असंख्य हिंदुत्ववादी संघटनेतील कार्यकर्त्यांसह शनिवारवाडय़ात प्रवेश केला.मुस्लिम महिलांनी ज्या ठिकाणी नमज पठण केले होते.त्या जागेवर जाऊन ती जागा गोमूत्र शिंपडून आणि शेणाने सारवून ती जागा शुद्ध करण्यात आली.त्यानंतर शिववंदना देखील म्हणण्यात आल्यानंतर, शनिवारवाडा परिसरात असलेली मजार काढून टाकण्यात यावी,अशी मागणी देखील मेधा कुलकर्णी यांनी पोलिस प्रशासनाकडे केली.
यावेळी मेधा कुलकर्णी म्हणाल्या, शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तू असून या ठिकाणी मुस्लिम महिला नमाज पठण करतात, ही बाब निषेधार्थ आहे. तुम्हाला नमाज पठण करायचे असेल तर घरी जाऊन करावे, यापुढील काळात अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाही. तसेच या ठिकाणी नमाज पठण करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे
तसेच त्या पुढे म्हणाल्या, या शनिवारवाडा परिसरात असलेली मजार काढून टाकण्यात यावी, अन्यथा आम्ही येत्या कालावधीत आमच्या स्टाईलने ती मजार काढून टाकू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.