scorecardresearch

कोथरुडमधील गुंड शरद मोहोळ तडीपार

कोथरुड भागात दहशत निर्माण करणाऱ्या गुंड शरद मोहोळला शहरातून तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दिले.

sharad Mohol
शरद मोहोळ

पुणे : कोथरुड भागात दहशत निर्माण करणाऱ्या गुंड शरद मोहोळला शहरातून तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दिले. शरद हिरामण मोहोळ (वय ३८, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरुड) याच्या विरोधात पुणे शहर, पिंपरी तसेच ग्रामीण भागात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून नीलायम चित्रपटागृहाजवळ एका हॉटेलमध्ये शरद मोहोळ आणि साथीदारांनी केला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने मोहोळला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोहोळला गेल्या वर्षी जामीन मंजूर केला होता. कारागृहाबाहेर आल्यानंतर मोहोळ आणि साथीदारांनी दहशत माजविण्याचे गुन्हे केले होते. मोहोळला शहरातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, गु्न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी भास्कर बुचडे, अजय सावंत, अनिल बारड यांनी तयार केला. त्यानंतर या मोहोळला शहरातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad mohol tadipar kothrud panic crime pune print news ysh

ताज्या बातम्या