पुणे : आम्हाला मेळाव्याला येणे शक्य नसल्याचे पत्र व्यापाऱ्यांनी दिल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती शहरात सोमवारी होणारा व्यापाऱ्यांचा मेळावा रद्द करण्यात आला. पूर्वी असे कधी घडले नव्हते, अशा शब्दांत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे हा मेळावा रद्द करण्यासाठी बड्या नेत्याचा दबाव होता, अशी कुजबूज बारामतीत सुरू झाली.

शरद पवार म्हणाले, की बारामतीतील व्यापाऱ्यांचे प्रश्न मी नेहमी सोडवतो. व्यापाऱ्यांबरोबर आज माझी चर्चा होती. मात्र, अचानक मेळावा रद्द करण्यासंबंधीचे पत्र मला त्यांच्याकडून मिळाले. गेल्या पन्नास वर्षात असे कधी घडले नव्हते. मला माहित नाही, बारामतीतील व्यापाऱ्यांना कशाची चिंता वाटते.

हेही वाचा >>>ओला-उबरच्या दरांबाबत निर्णय होईना, सोमवारची बैठकही निष्फळ; आज तोडग्याचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्यापाऱ्यांशी त्यांच्या प्रश्नांसाठी मी अनेक वेळा चर्चा केली, परंतु ‘आम्हाला जमणार नाही’ असे गेल्या पन्नास वर्षात त्यांनी कधीच कळवले नव्हते. हे पहिल्यांदा घडले. त्यांना बहुदा कशाचीतरी चिंता वाटत असावी. त्यामुळे कार्यक्रम घेण्यापेक्षा तो न घेतलेला बरा असे त्यांना वाटले. त्यांनी समोरच्याचे ऐकूनही घ्यायचे नाही असे ठरवले, त्याची मला खंत वाटते, असा तपशील शरद पवार यांनी वकिलांच्या मेळाव्यात उघड केला.