पुणे :  शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी माजी आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांची तात्पुरता जामीन देण्याची मागणी सत्र न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी फेटाळून लावली. भोसले यांनी वैद्यकीय कारणासाठी तात्पुरता जामीन देण्याची मागणी त्यांच्या वकिलांमार्फत न्यायालयाकडे केली होती.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडमधील त्या वकिलाची हत्या प्रेम प्रेमप्रकरणातून! नात्यातील महिलेसोबत होते प्रेमसंबंध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भोसले यांना मूत्रपिंडाचा (किडनी) विकार आहे. किडनी विकारावर ससून रुग्णालयात उपचाराची सुविधा नाही. शहरातील खासगी रूग्णालयात किडनी उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती भोसले यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती. सरकारी वकील ॲड. विलास पठारे आणि गुंतवणूकदारांचे वकील ॲड. सागर कोठारी यांनी भोसले यांच्या जामिनास विरोध केला. भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालय; तसेच शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायालयात तात्पुरता जामीन मिळवण्यासाठी अर्ज केले. एकाच वेळी दोन न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केल्याची बाब न्यायालयापासून लपवून ठेवली. ससून रुग्णालयाने दिलेल्या वैद्यकीय अहवालाबाबत ॲड. कोठारी यांनी आक्षेप घेतला.  भोसले यांना जामीन मंजूर करण्याची गरज नाही. नियमानुसार शासकीय किंवा खासगीय रुग्णालयात ते उपचार घेऊ शकतात, असे सरकारी वकील ॲड. पठारे यांनी सांगितले. सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने भोसले यांचा जामीन फेटाळून लावला.