लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: अवघे राज्य पावसाची प्रतीक्षा करत असताना भारतीय हवामान विभागाकडून दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून. राज्यात ५ सप्टेंबरनंतर मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली झाली. सप्टेंबर सुरू होऊनही अद्याप राज्यातील काही धरणांमध्ये पुढील वर्षभरासाठीचा पुरेसा पाणीसाठा जमा झालेला नाही. तसेच काही जिल्ह्यांमध्ये पिके, जनावरांचा चारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोसमी पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या ४८ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५ सप्टेंबरनंतर राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आणखी वाचा-आता ‘रेस्टॉरन्ट ऑन व्हील्स’! पुण्यात रेल्वेच्या डब्यातच उपाहारगृह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस, पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने नमूद केले आहे. तर गेल्या चोवीस तासांत कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.