पुणे: शहरात झिका आजाराचा रुग्ण आढळलेल्या परिसरात आणखी सहा संशयित रुग्ण सापडले आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत.

यंदा पुण्यातील झिकाचा पहिला रुग्ण येरवड्यातील प्रतीकनगरमध्ये मागील आठवड्यात सापडला. या रुग्णाची प्रकृती आता सुधारत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पुणे महापालिकेने या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आता याच भागात सहा संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांना तापाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा… पिंपरी-चिंचवडकरांसाठी आगामी वर्ष आणखी पाणीकपातीचे?

झिकाचा पुण्यातील पहिला रुग्ण ६४ वर्षांची महिला होती. काही दिवसांपूर्वी पिंपरी- चिंचवडमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता. त्याला या महिलेने हजेरी लावली होती. त्यानंतर तिला ताप आला आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला. तिला पुण्यातील खासगी रुणालयात दाखल करण्यात आले. तिच्या तपासणीत अखेर झिकाचे निदान झाले होते.

दरम्यान, पिंपरी- चिंचवडमधील सांस्कृतिक कार्यक्रमाला केरळमधील अनेक जण उपस्थित होते. त्यातील एखाद्या बाधित व्यक्तीकडून या महिलेला संसर्ग झाला असू शकतो, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येरवड्यात झिकाचा रुग्ण आढळलेल्या परिसरात आणखी सहा संशयित रुग्ण सापडले आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. पहिल्या रुग्णाच्या कुटुंबातील पाच सदस्यांच्या तपासणीचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत.