पुणे : शिवसेना पुणे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक नाना भानगिरे यांच्या विशेष प्रयत्नामधून हडपसर भागातील हांडेवाडी रोड येथे ‘प्रभू श्रीराम’ यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार योगेश टिळेकर यांच्या सह नागरिक उपस्थित होते.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, अयोध्येत भव्य दिव्य प्रभू श्रीराम यांचं मंदिर उभारलं जाईल, असे काही लोकांना वाटत नव्हतं, ते लोक टिंगल करायचे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारीख पण जाहीर केली. भूमिपूजनदेखील केलं आणि आज आपण सर्वजण अयोध्येत जाऊन प्रभू श्रीराम यांच्या भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत आहोत, तसेच जम्मू काश्मीरमधील ३७० कलम देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हटवलं आहे. तसेच प्रभू श्रीराम आणि अयोध्या हे आपल्या अस्मितेचा, आपल्या श्रद्धेचा विषय आहे. परंतु काही लोकांनी तो विषय राजकीय करून टाकला. आता त्या लोकांना योग्य धडा शिकवायचा असल्याचे सांगत विरोधकांवर त्यांनी टीका केली.

आणखी वाचा-गुजरातमधील अमली पदार्थ तस्कर अटकेत, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

तसेच ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आज पुण्यात पार पडला. रक्षाबंधनाच्या अगोदर १ कोटी ४ लाख महिलांच्या खात्यामध्ये ३ हजार रुपये जमा होणार आहेत. या गोष्टीचा मला मनापासून आनंद आहे. तसेच या ठिकाणी माझे लाडके भाऊ देखील उपस्थित असून त्यांच्यासाठी देखील योजना आणली आहे. त्याही पुढे जाऊन ज्येष्ठ नागरिकांकरीता वयोश्री योजना आणली. त्या योजनेचे देखील पैसे खात्यात जमा होणार आहे. याच ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री देवदर्शन योजना आणली आहे. त्याची सुरुवात देखील लवकरच होईल. पण आता त्याचा उपयोग विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षाला काहीच काम राहणार नाही. ते लोक तीर्थ दर्शनाला पाठवून देऊ, अशा शब्दात विरोधकांवर त्यांनी निशाणा साधत पुढे म्हणाले की, आता सर्व राम भक्तांनी लक्षात ठेवा, लोकसभे सारख गाफिल राहू नका. एकदम जागरूक रहा, असे आवाहनदेखील त्यांनी उपस्थितांना केले.