कृष्णा पांचाळ
पुणे आणि पिंपरीत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १५ वर पोहचली आहे. त्यामुळे सगळ्यांनीच या व्हायरसची धास्ती घेतली आहे. अशात पिंपरीत शिक्षणासाठी लातूरहून आलेला एक मुलगा आईच्या सततच्या काळजीमुळे गावी परतल आहे. पिंपरी चिंचवड किंवा पुण्यात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. पिंपरीत शिकणारा मुकेश हंबीरे हा मुलगा आईच्या काळजीमुळे घरी पोहचला आहे. खासगी बसने तो शनिवारी रात्री लातूरकडे निघाला आणि त्यानंतर लातूरला घरी पोहचला.

मुकेश हंबीरे हा तरुण देखील पिंपरी-चिंचवड शहरात गेली तीन वर्षे झालं शिक्षण घेत आहे. मात्र, करोना चा प्रादुर्भाव हा शहरात मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मुकेश ची आई काळजी पोटी दिवसातून अनेक वेळा फोन करून काळजी घे असे सांगत असून लवकर गावी ये असा आग्रह करत होती. त्यामुळे अखेर त्याने लातूरला जाण्याचा निर्णय घेतला आणि तो लातूरला पोहचला आहे.

मुकेश हंबीरे हा तरुण पिंपरी-चिंचवड शहरात एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. तो गेल्या तीन वर्षांपासून शहरात वास्तव्यास असून मिळेल त्या वेळेत तो लातूर जिल्ह्यात असलेल्या गावी जातो. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून करोना ने थैमान घातल आहे. दिवसेंदिवस करोना बधितांचा आकडा वाढतच चालेला आहे. यामुळे मुकेशला त्याची आई अनेक फोन करून बाळू तू लवकर घरी ये स्वतः ची काळजी घे अस फोनवरून सांगत होती. साहजिकच करोनाशी संबंधित असलेली प्रत्येक बातमी आईपर्यंत नक्कीच पोहचत असते त्यामुळे आईची काळजी मिटावी म्हणून मुकेश लातूरला पोहचला आहे.

यावेळी मुकेश हंबीरे म्हणाला की, आई परीक्षेच्या वेळी पुण्यात आली होती. त्यानंतर आई गावी निघून गेली..परंतु आता शहरात करोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढला आहे. आईचा विचारपूस करण्यासाठी नेहमी फोन यायचा. मात्र, आता करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून दिवसात अनेकदा येऊ लागले. कॉलेज जाऊदेत तू घरी ये असे आई काळजीपोटी म्हणू लागली होती. कुटुंबीयांना भीती वाटत होती. त्यामुळे मी आता घरी परतलो आहे असे या विद्यार्थ्याने सांगितले.